शुक्रवार 18 मार्च 2005

एक नवीन मराठी साइट

काही महिन्यांपूर्वी मला मनोगत.कॉम ह्या साइटचा पत्ता लागला. म्हणता म्हणता ह्या साइटच्या सदस्यांची संख्या आता खूपच वाढली आहे. एकंदर स्वरूप गप्पा-टप्पा इकडच्या तिकडच्या गोष्टी, वाद-संवाद, कविता, लेख (आणि अर्थातच ह्या सगळ्यावर मनसोक्त चर्चा) असे आहे.

खरोखरच अतिशय प्रशंसनीय उपक्रम आहे. मी आस्वाद दररोजच घेतो. मधूनच कधीतरी चार ओळी लिहीतोसुद्धा.

हो, आणि विषेश बाब ही की मराठीतून लिहायला तुम्हाला दुसरा keyboard शिकायचीही गरज नाही. तुमचा नेहेमीचा इंग्लिश keyboard वापरून तुम्ही मराठीतून लिहू शकता.

जरूर एकदा ह्या साइटला भेट द्या.

बुधवार 2 मार्च 2005

मोझिलाचंच चुकतंय

इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये मराठी ब्लॉगची शीर्षके व्यवस्थीत दिसतात पण मोझिलामध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ असा की मोझिलामध्येच काहीतरी गडबड आहे.

ठीक आहे. आता मी नियमीतपणे ब्लॉग करणार असं म्हणतोय. बघुया कसं जमतंय ते!

काहीतरी चुकतंय

पहिला संदेश प्रकाशित केल्यावर लक्षात आलं की ब्लॉगरमध्ये मराठीमधील शीर्षके बरोबर दिसत नाहीत. मी आता ब्लॉगरच्या लोकांना तक्रार करुन बघतो. बघुया काय होतंय ते.

-अमित