शुक्रवार, १८ मार्च, २००५

एक नवीन मराठी साइट

काही महिन्यांपूर्वी मला मनोगत.कॉम ह्या साइटचा पत्ता लागला. म्हणता म्हणता ह्या साइटच्या सदस्यांची संख्या आता खूपच वाढली आहे. एकंदर स्वरूप गप्पा-टप्पा इकडच्या तिकडच्या गोष्टी, वाद-संवाद, कविता, लेख (आणि अर्थातच ह्या सगळ्यावर मनसोक्त चर्चा) असे आहे.

खरोखरच अतिशय प्रशंसनीय उपक्रम आहे. मी आस्वाद दररोजच घेतो. मधूनच कधीतरी चार ओळी लिहीतोसुद्धा.

हो, आणि विषेश बाब ही की मराठीतून लिहायला तुम्हाला दुसरा keyboard शिकायचीही गरज नाही. तुमचा नेहेमीचा इंग्लिश keyboard वापरून तुम्ही मराठीतून लिहू शकता.

जरूर एकदा ह्या साइटला भेट द्या.

२ टिप्पण्या:

cleverviv म्हणाले...

अमित,
मस्त ब्लॉग आहे तुझा..
मी पण मराठी युनीकोड मध्ये साइट तयार केली आहे..
तुझा ब्लॉग फार आवडला..

eddyharolds9677783451 म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.