मायक्रोसॉफ्टने विंडोज लाईव्ह रायटर नावाची नवीन सुविधा आता उपलब्ध केली आहे. हा प्रोग्राम वापरून ब्लॉगर वेबसाईटवर न जाता सरळ तुमच्या संगणकावरूनच ब्लॉगस्पॉटवर लेखन प्रसिद्ध करता येते. म्हणजे तुम्ही जर डायल-अप वापरत असाल तर आधी लेखन करून ते संगणकावर साठवता येते आणि मग डायल केल्यावर ते ब्लॉगस्पॉटवर चढवता (Upload) येते. शिवाय तुमच्या अनुदिनीत छायाचित्रे किंवा इतर माध्यामातील फाइल्सही सहज समाविष्ट करता येतात. अनेक ब्लॉगवर प्रसिद्धीसाठी सुविधा 'रायटर' मध्ये उपलब्ध आहेत. एकदा वापरून बघा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा